वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात प्रशोभक वक्तव्य करणे आले गायकवाड यांच्या अंगलट
पनवेल | प्रतिनिधी |
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात प्रशोभक वक्तव्य करणे पनवेल पालिकेतील माजी उपमहापौर जगदीश गायकवाड यांच्या चांगलंच अंगलट आले आहे. वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी चेंबूर येथील एका बार मध्ये मद्य धुंद अवस्थेत बसलेल्या गायकवाड यांना मारहाण केली असून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू बाळासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात प्रशोभक वक्तव्य करणाऱ्या जगदीश गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी वंचीत च्या कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे.
रिपब्लिकन पक्ष आठवले गटाचे रायगड जिल्ह्यातील नेते व पनवेल पालिकेतील नगरसेवक माजी उपमाहापौर जगदीश गायकवाड यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांच्याविरोधात अत्यंत गलिच्छ भाषेत टीका केल्याची ध्वनी चित्रफित काही दिवसा पूर्वी समाज माध्यमावर व्हायरल झाली होती.या मुळे गायकवाड यांच्या विरोधात वंचित आघाडीच्या कार्यकर्त्यांन मध्ये निर्माण झालेल्या रोशाची दखल पोलीस प्रशासनाने घेतल्याने गायकवाड यांच्या विरोधात विविध पोलीस ठाण्या अंतर्गत अटकेची कारवाई करण्यात आली होती. या कारवाई नंतरही आंबेडकर समर्थकांमध्ये गायकवाड यांच्या विरोधात रोशाची भावना होती.
अशातच पोलिसांकडून सुटका झाल्या नंतर सोमवारी ( ता.23) गायकवाड हे मुबंई मधील चेंबूर या ठिकाणी असलेल्या एका बार मध्ये मद्यपान करण्यासाठी गेले असता त्या ठिकाणी अगोदरच उपस्थित असलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि गायकवाड यांच्या मध्ये शाब्दिक बाचाबाची होऊन प्रकरण हाणामारी पर्यत पोहचल्याचे समाज माध्यमावर प्रसिद्ध झालेल्या चित्र फितीतून पाहायला मिळाले आहे.
या वेळी मद्य धुंद अवस्थेत असलेल्या गायकवाड यांनी वंचित च्या कार्यकर्त्याला बंधूकीच्या धाकाणे धमकवण्याचा प्रयत्न करून मारहाण केल्याचा आरोप करत गायकवाड यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी करत वंचीत च्या कार्यकर्त्यांनी घोषणा बाजी केल्याने घटनेचे गांभीर्य ओळखत चुना भट्टी पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी गायकवाड यांना ताब्यात घेतल्याची माहिती देण्यात आली आहे.