आत्माराम आपटे यांचे निधन

| रेवदंडा | प्रतिनिधी |

रायगड प्रेस क्लबचे माजी जिल्हाध्यक्ष तसेच सल्लागार पत्रकार अभय आपटे यांचे वडिल आत्माराम आपटे यांचे गुरूवारी (दि.11) निधन झाले. निधनसमयी ते 93 वर्षाचे होते. ते रोहा तालुक्यातील खारी शाळेतून निवृत्त झाले होते. त्यांचा शाळेमध्ये परिपाठ घेण्यात हातखंडा होता. निवृत्ती नंतर त्यांनी सामाजिक कार्याला झोकून दिले होते. येथील विठ्ठल-रखुमाई देवस्थानात कार्यकारी मंडळात होते तर रेवदंडा ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या ठिकाणी ते अनेक वर्षे सचिव म्हणून होते. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, सुन, नात व अन्य परिवार आहे. त्यांच्या अत्यंविधीसाठी ज्येष्ठ पत्रकार नागेश कुलकर्णी, रेवदंडा सरपंच प्रफुल्ल मोरे, उपसरपंच संतोष मोरे, राजन वाडकर, सुराराम माळी, किशोर मानकर, दिलिप पटेल, विजय मानकर, चंद्रकांत पाटील, नदिम मुकादम, प्रकाश दांडेकर, ओमकार नागावकर, निलेश फुंडे, मिथून वैद्य तसेच रेवदंडा व पंचक्रोशीतील अनेक मान्यवर मंडळी उपस्थिती होती.

Exit mobile version