I अलिबाग I विशेष प्रतिनिधी I
रायगड जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार सांस्कृतिक चळवळीचे ज्येष्ठ कार्यकर्ते अलिबाग येथील भाऊ सिनकर यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले . ते 94 वर्षांचे होते. अतिशय खडतर परिस्थितीत त्यांनी कुलाबा दर्पण हे दैनिक अतिशय निष्ठेने चालवले. अनेक नामवंत दैनिकात देखील त्यांनी काम केले. त्याकाळी त्यांची छायाचित्रे मुंबईतील दैनिकात प्रसिद्ध होत असत. काही महिन्यांपूर्वीच त्यांच्या पत्नीचे निधन झाले होते. त्यांच्या पश्चात पुत्र, कन्या, नातवंडे, जावई, सूना असा मोठा परिवार आहे अलिबाग येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.