रसायनीत महिलेवर अत्याचार; आरोपी केले जेरबंद

। रसायनी । वार्ताहर ।
रसायनीत एका महिलेवर अत्याचार करणार्‍या नराधमांच्या रसायनी पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून त्यांना जेरबंद केले आहे. अश्‍लिल व्हिडिओ प्रसारित करण्याची धमकी देत मोहोपाडा येथील महिलेवर अत्याचार करण्याची घटना घडली असून आरोपी विरोधात रसायनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत रसायनी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सावळे गावात राहणारा आरोपी राजेश बाळाराम कुरंगळे यांने फिर्यादी महिलेचे बनवलेले अश्‍लिल व्हिडीओ व्हायरल करेल अशी वारंवार धमकी देवुन फिर्यादी महिलेसोबत वारंवार जबरदस्तीने मनाविरूद्ध संबंध ठेवून तिला गुळसुंदे येथील एका घरामध्ये पंधरा दिवस कोंडून ठेवून शारीरिक संबंध ठेवले. या प्रकरणात राजेश कुरंगळे यांना त्यांच्या इतर आरोपींनी अपहरण करण्यास मदत केली. याप्रकरणी रसायनी पोलिसांनी राजेश बाळाराम कुरंगळे (वय 33), स्वप्निल माणिक जोशी (वय 32), निलेश सुरेश माठल (वय 21), भरत नामदेव जांभळे (वय 33)तर पाचवा आरोपी आश्‍विन हा फरार आहे. यातील चार आरोपीच्या रसायनी पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून पुढील तपास सुरू आहे.

Exit mobile version