कर्जतमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार

10 युवकांना पोलिसांनी घेतले ताब्यात
। कर्जत । वार्ताहर ।
कर्जत तालुक्यात पुन्हा एकदा अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर दहा महाविद्यालयीन तरूणांनी हा अत्याचार केल्याची माहिती समोर येत असून या तरूणांना आता कर्जत पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर त्यांच्यावर कर्जत पोलीस ठाण्यात पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना पनवेल न्यायालयात हजर करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

कर्जत तालुक्यातहील गोरकामत येथे राहणार्‍या 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तेथेच राहणार्‍या काही तरूणांनी सुरूवातीला जवळीक करत तिच्यावर अत्याचार केला होात. यानंतर याचा व्हिडीओ तयार करून या 10 तरूणांनी ब्लॅकमेल करीत अत्याचार केला आहे. याबाबात पोलीस ठाण्यात या मुलीने सोमवारी (दि.18) तक्रार दाखल केल्याने गावातच राहणार्‍या काही तरूणांना व परिसरातील तरूणांना कर्जत पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत कर्जत पोलीस ठाण्यात पॉस्को अंतर्गत गुन्हा देखील दाखल करण्यात आला असून, त्यांना तहसील कार्यालय येथील कोठडीत सुरूवातीला ठेवण्यात आले असून त्यांना पनवेल सेशन कोर्टात हजर करण्यासाठी नेले असल्याची माहिती समोर येत आहे. एकूणच तालुक्यात याअगोदर देखील असे गुन्हे दाखल करण्यात आले असून या 13 वषी्रय मुलीवर झालेल्या अत्याचारामुळे कर्जत तालुका पूर्णपणे हादरून गेला आहे. तर अत्याचार करणारे काही तरूण हे 20 वर्षीय कॉलेज तरूण असल्याची माहिती यावेळी कर्जत पोलिसांकडून देण्यात आली असून काही तरूण वेगवेगळ्या क्षेत्रात आपले करीयर करीत असल्याचे बोलले जात आहे.

Exit mobile version