पाकिस्तानमध्ये शस्त्रधारी दहशतवाद्यांचा हल्ला

। इस्लामाबाद । वृत्तसंस्था ।

पाकिस्तानमधील बलुचिस्तानमधील नैऋत्य पाकिस्तानमध्ये शस्त्रधारी दहशतवाद्यांनी तब्बल 23 जणांना गोळ्या मारल्या आहेत. वाहनातुन जबरदस्तीने उतरायला लावून अतिरेक्यांनी हे कृत्य केले आहे.

बलुचिस्तान प्रांतातील मुसाखैल जिल्ह्यात हा धक्कादायक प्रकार सोमवारी (दि.26) घडला आहे. अतिरेक्यांनी बस, ट्रक्स आणि व्हॅन्सना थांबवून लोकांवर थेट गोळीबार केला. यात साधारण 22 जणांचा मृत्यू झाला आहे. पंजाब आणि बलुचिस्तान यांना जोडणाऱ्या एका महामार्गावर ही घटना घडली आहे, या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनांना थांबवण्यात आले. अतिरेक्यांनी या प्रवाशांना त्यांचा पत्ता विचारला. जे लोक पाकिस्तानमधील पंजाब प्रांतातील होते, त्यांनाच गोल्या घालून ठार मारण्यात आले आहे. या घटनेचा संपूर्ण पाकिस्तानात निषेध व्यक्त केला जातोय.

Exit mobile version