हेरंब कुलकर्णी यांच्यावर हल्ला, मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल

| मुंबई | प्रतिनिधी |
शिक्षण क्षेत्राबाबत विपुल लेखन केलेले ज्येष्ठ लेखक आणि विचारवंत हेरंब कुलकर्णी यांच्यावर अहमदनगर येथे हल्ला झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेची तात्काळ दखल घेतली. कुलकर्णी यांच्यावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांना तत्काळ अटक करण्याचे निर्देश त्यांनी अहमदनगर पोलिस अधीक्षकांना दिले.

मुख्यमंत्री शिंदे यांनी कुलकर्णी यांना फोन करून त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. तसेच त्यांना लागेल ती मदत करण्याची तयारी दर्शवली. गेल्या काही दिवसांपासून शाळेपासून 100 मीटरच्या अंतरावर गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होऊ नये, यासाठी आपण आंदोलन करत असल्याचे त्यांनी सांगितले. याच गोष्टीचा आकस मनात बाळगून आपल्यावर हल्ला करण्यात आला असावा, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली.

Exit mobile version