मुंबईतील महापंचायतसाठी 300 कार्यकत्याची हजेरी

। नेरळ । वार्ताहर ।
डावे पक्ष आणि अखिल भारतीय शेतकरी कामगार पक्ष यांच्या माध्यमातून 28 नोव्हेंबर रोजी मुंबईतील आझाद मैदानात महापंचायत आयोजित केली होती. या महापंचायत आयोजित करण्यात आली होती,त्यासाठी कर्जत तालुक्यातील शेतकरी कामगार पक्षाचे 300 हुन अधिक कार्यकर्ते गेले होते.
लखीमपूर येथील हत्याकांड नंतर त्या शेतकर्‍यांचे श्राद्ध आणि त्यानिमिताने राज्यातील डाव्या पक्षांनी मुंबईतील आझाद मैदानात महापंचायत आयोजित केली होती. त्या महापंचायत साठी कर्जत तालुक्यातून शेतकरी कामगार पक्षाचे असंख्य कार्यकर्ते या महापंचायत साठी मुंबईत पोहचले होते. कर्जत तालुक्यातून जिल्हा परिषद सदस्य नारायण डामसे आणि शेकापचे जिल्हा खजिनदार श्रीराम राणे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे कार्यकर्ते कर्जत,भिवपुरी रोड,नेरळ,शेलू आणि वांगणी रेल्वे स्थानकातून निघाले होते. त्यात पक्षाचे नेते विलास थोरवे, पुरोगामी युवक संघटना तालुका अध्यक्ष वैभव भगत आदींसह पक्षाचे सर्व कार्यकर्ते उपनगरीय लोकल ने निघाले होते.शेकापचे कार्यकर्ते यांनी नेरळ,कर्जत रेल्वे स्थानक परिसर लाल झेंडे आणि कार्यकर्त्यांच्या लाल कपड्यांनी लाल रंगाचा बनला होता.

Exit mobile version