। पनवेल । वार्ताहर ।
नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने कारवाई करून पकडण्यात आलेल्या वाहनांचा लिलाव 25 जुलै रोजी लिलाव करण्यात येणार आहे. या वाहनधारकांना वेळोवेळी सूचना देऊनही त्यांच्याकडून वाहन ताब्यात घेण्याबाबत कोणतीही कारवाई झालेली नसल्याने परिवहन विभागाच्या वतीने या वाहनांचा लिलाव करण्यात येणार आहे.
25 जुलै रोजी सकाळी 11 वाजता ई टेडरिंग पद्धतीने जाहीर लिलाव करण्यात येणार आहे. नवी मुंबई येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वायुवेग पथकाने अटकावून ठवलेल्या 99 वाहनांचा महाराष्ट्र वाहन कर कायदा 1959 तसेच मोटार वाहन कायदा 1988 मधील तरतूद वापरून अटकाव करण्यात आलेल्या वाहनांचा लिलाव करण्यात येणार आहे. इच्छुकांनी या लिलावात भाग घ्यावा, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांनी केले आहे.