ऑडीची दोन रिक्षांना धडक; चार जण जखमी

। मुंबई । वार्ताहर ।

मुंबईतील मुलुंडमध्ये एका भरधाव ऑडी कारने दोन रिक्षांना जोरदार धडक दिली. या अपघातात रिक्षाचालक आणि प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर ऑडीचालक फरार झाला आहे.

मुलुंड परिसरात आज (दि. 22) सकाळी साडे सहाच्या सुमारास एका भरधाव ऑडी कारने दोन रिक्षांना धडक दिली. या अपघातात रिक्षा चालकांसह दोन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. तर, या घटनेनंतर कारचालक आपली कार तिथेच ओडून फरार झाला. घटनेची माहिती मिळताच मुलुंड पोलीस घटनास्थळी हजर झाले असून पोलिसांनी गाडी ताब्यात घेतली आहे. तसेच, चालकाचा पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे.

Exit mobile version