अवधूत तटकरे भाजपात

| पनवेल | प्रतिनिधी |
शिवसेनेचे शिवबंधन सोडून खासदार सुनील तटकरे यांचे पुतणे अवधूत तटकरे यांनी मुंबईत भाजपमध्ये प्रवेश केला. शुक्रवारी मुंबईत भाजपच्या दादर येथील वसंत स्मृती येथे प्रदेशाध्यक्ष डॉ. चंद्रशेखर बावनकुळे व सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी माजी आ. नरेंद्र मेहता, भाजप प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील उपस्थित होते.

भाजपसारख्या राष्ट्रीय विचाराच्या पक्षात प्रवेश करताना आपल्याला आनंद वाटतोय.रायगड जिल्ह्यात ज्या भागात भाजपसाठी अत्यावश्यक आहे, त्या ठिकाणी पक्षादेशानुसार कार्य करून स्वतःला सिद्ध करण्यासाठी मेहनत घेण्याची भूमिका अवधूत तटकरे यांनी व्यक्त केली.

अवधूत तटकरे यांचा प्रवेश हा महाविकास आघाडीला पर्यायाने खासदार सुनील तटकरे यांच्यासाठी मोठा आघात मानता येईल. कारण, अवधूत तटकरे यांची रोहा नगर परिषद नगराध्यक्ष आणि श्रीवर्धन मतदारसंघांचे आमदार म्हणून कारकीर्द मोठी नावाजलेली आहे. प्रशासनावर मजबूत पकड ठेवण्यात ते माहीर आहेत. विशेषतः युवावर्ग मोठ्या प्रमाणात त्यांना मानतो. त्यामुळे त्यांचा भाजप प्रवेश हा भाजपला मोठा लाभ देणारा ठरणार आहे.

Exit mobile version