अवंतिका ठरली ‘आयकॉन ऑफ महाराष्ट्र’

| खांब-रोहा | वार्ताहर |

रोहा तालुक्यातील मालसई गावची सुकन्या असलेली अवंतिका अनिल मोहिते हिने मॉडेलिंग स्पर्धेत सर्वोत्कृष्ट कामगिरी करून विजेती ठरली आहे.

आयकॉन ऑफ महाराष्ट्र यांच्या वतीने सदरची मॉडेलिंग स्पर्धा ही मुंबई येथे मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आली. या स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील विविध शहरं आणि विभागातून मोठ्या प्रमाणावर स्पर्धक सहभागी झाले होते. तर, ग्रामीण भागातून या मोठ्या स्पर्धेत अवंतिकाने सहभाग नोंदवून या स्पर्धेत विजयाची मोहर उमटविल्याने तिच्या या सुयशाबद्दल सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे. सध्या ती एम.बी. मोरे महाविद्यालय धाटाव येथे आपले विद्यालयीन शिक्षण घेत आहे.

मॉडेलिंग या क्षेत्राबद्दल अवंतिकाला लहानपणापासून विशेष अशी आवड असून, त्याच क्षेत्रात आपले करिअर करण्याचा तिचा मानस असल्याचे तिने याबाबत माहिती देताना सांगितले. तर तिच्या या सुयशाबद्दल मालसई ग्रामस्थ, महिला मंडळ व तरूण मंडळ यांच्यासह संपूर्ण तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी यांच्याकडून अभिनंदन व्यक्त होताना दिसत आहे.

Exit mobile version