| आपटा | वार्ताहर |
नागोठणे येथील रिलायन्स टाउनशिप येथे दरवर्षी प्रमाणे रायगड मेडिकल अससोसिएशन चे डॉक्टर्स प्रीमियर लीग ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत सामन्यात रसायनी लायन्सने (प्रायमा) ह्या स्पर्धेत सलग 5 वर्ष जिंकून अजिंक्य राहण्याचा मान मिळवला आहे. सदर स्पर्धेत रसायनी संघ हा डॉ संजय कुरंगळे ह्यांच्या मार्गदर्शनाखाली खेळला आहे.अंतिम सामन्यात डॉ जितेंद्र पाटील ह्यांना मॅन ऑफ द मॅच मिळाला तसेच रसायनी संघाचे डॉ निलेश साळुंके ह्यांना मॅन ऑफ द सिरीज हा पुरस्कार मिळाला.