। कोलाड । वार्ताहर ।
रोहा तालुक्यातील गोवे गावातील अविनाश अशोक आंबेकर यांचे रविवारी (दि.6) निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 41 वर्षे होते. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, तीन बहिणी, चुलते व मोठा आंबेकर परिवार आहे. त्यांचे दशक्रिया विधी मंगळवारी (दि.15) तर उत्तरकार्य विधी शुक्रवारी (दि.18) गोवे येथील त्यांच्या राहत्या निवास्थानी होणार असल्याचे आंबेकर कुटुंबीयांकडून सांगण्यात आले आहे.