। अलिबाग । वार्ताहर ।
डायनामिक युथ स्पोर्ट अकॅडमी मुंबई इंडिया तर्फे संतोष रामचंद्र कवळे नवगाव यांना अभिमान महाराष्ट्राचा उत्कृष्ट क्रीडा प्रशिक्षक जीवन गौरव पुरस्कार अभिनेता शशिकांत केरकर यांच्या हस्ते देण्यात आला. संतोष कावळे हे कराटे उत्कृष्ट प्रशिक्षक असून त्यांनी राज्य, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय विद्यार्थी घडवलेत म्हणून हा पुरस्कार देण्यात आला. ते दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय कराटे परीक्षेत पंच आणि कोच परीक्षा पास आहेत. आता ते अलिबागमध्ये लाटी काठी कराटे ट्रॅडिशनल रेसलिंग या खेळाचे मुलांना प्रशिक्षण देतात.