शर्मिला गावंड यांना पुरस्कार

| उरण | वार्ताहर |

शिक्षण क्षेत्रात गेली 20 वर्षे निस्वार्थी वृत्तीने कार्य करणाऱ्या पिरकोन येथील रहिवासी व नवीन सेवा जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत असणाऱ्या शर्मिला महेंद्र गावंड यांना द्रोणागिरी स्पोर्ट्‌‍स असोसिएशनच्या वतीने आदर्श शिक्षिका म्हणून पुरस्कार देऊन गौरव करण्यात आले. त्यांच्यावर सर्वच स्तरातून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

यावेळी व्यासपीठावर माजी आ. मनोहर भोईर, जेएनपीटीचे माजी विश्वस्त कॉ. भूषण पाटील, ज्येष्ठ साहित्यिक एल.बी. पाटील, कवी अरुण म्हात्रे, ज्येष्ठ गायक भालचंद्र म्हात्रे, पत्रकार मिलिंद खारपाटील, द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष महादेव घरत, महिला विभाग प्रमुख वैशाली घरत, उपाध्यक्ष मनोज पडते, खजिनदार शिवेंद्र म्हात्रे, सल्लागार नरेश म्हात्रे, सचिव दिलीप तांडेल, क्रीडा प्रमुख भरत म्हात्रे व द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.

Exit mobile version