सुवर्णा जाधव यांना पुरस्कार

| माणगाव | वार्ताहर |

माणगाव येथील नवदुर्गा महिला बचतगट एकतानगरच्या अध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णा रुपेश जाधव यांना अविष्कार फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य रायगड जिल्हा शाखेतर्फे राज्यस्तरीय राज्यस्तरीय “राजमाता जिजाऊ पुरस्कार“ 2024 जाहीर झाला. असल्याची माहिती निवड पत्र पाठवून फाऊंडेशनचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष पत्रकार संजय पवार व फाऊंडेशनचे रायगड जिल्हाध्यक्ष तथा निवड समितीचे सदस्य शंकर शिंदे यांनी दिली. या पुरस्काराचे वितरण 24 एप्रिल 2024 रोजी सकाळी 10:30 वा.पंढरपूर याठिकाणी होणाऱ्या भव्यदिव्य कार्यक्रमात करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेतर्फे देण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णा जाधव यांची उपरोक्त संस्थेकडून राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ पुरस्कार 2024 पुरस्कारासाठी निवड झाल्याने त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे. सुवर्णा जाधव यांना त्यांच्या माणगाव एकतानगर येथील निवास्थानी हे निवडपत्र देण्यात आले.

Exit mobile version