आदर्श शिक्षकांना पुरस्कार प्रदान

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग शाखा रायगडचा भव्य शिक्षक मेळावा व जिल्ह्यातील आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा महाड येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक महाड येथे संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी प्रमुख मान्यवर महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाचे संस्थापक आमदार संजय केळकर, शिवसेना पक्षप्रतोद आ. भरत गोगावले, आदर्श शिक्षण समूहाचे अध्यक्ष धनराज विसपुते, शिक्षक परिषदेचे राज्य अध्यक्ष राजेश सुर्वे, शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र म्हात्रे, अलिबाग पतपेढीचे चेअरमन सुशील वाघमारे, नरेंद्र गुरव, वैभव पिंगळे, संदीप शिंदे, दीप्ती गावंड, पूजा शहा आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात आ. संजय केळकर यांच्या हस्ते दीप प्रज्ज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष विजय पवार यांनी केले. राज्याध्यक्ष राजेश सुर्वे यांनी मनोगत व्यक्त करताना शिक्षक परिषदेचे राज्य स्तरावर केलेल्या कामाचा आढावा सांगितला. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रायगड जिल्ह्यातील प्रशांत तुळसुळकर-पोलादपूर, बाळासाहेब बारगजे- महाड, मुकेश भोस्तेकर- माणगाव, बालाजी राठोड-म्हसळा, प्रणाली पवार- श्रीवर्धन, संतोष धुटुकडे- तळा, हर्षा काळे -रोहा, हेमंत म्हात्रे- मुरुड, रेश्मा जाधव- खालापूर, प्रियंका हरवंदे- कर्जत, सुनील साळवी- पनवेल, स्मिता पाब्रेकर -माणगाव या शिक्षकांचा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. अलिबाग पतपेढीच्या झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत निवडून आलेल्या सर्व संचालकाचा सत्कार संघटनेच्या वतीने करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब बारगजे यांनी, तर आभार प्रदर्शन वैभव कांबळे यांनी मानले.

Exit mobile version