| माणगाव | प्रतिनिधी |
माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाची द.ग तटकरे महाविद्यालय माणगाव रायगड राष्ट्रीय सेवा योजना विभाग आयोजित 7 ऑक्टोबर रोजी संविधानाविषयी जनजागृती कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमासाठी राहुल तळकर उपस्थित होते. त्यांनी आपल्या मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांना संविधान म्हणजे काय, संविधानामध्ये असणारे मूलभूत हक्क, मूलभूत कर्तव्य, घटना निर्मितीमध्ये भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान, न्याय, स्वातंत्र्य, समता, आणि बंधुता याची शिकवण जगाला देणारे संविधान असे बहुमूल्य मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले. या कार्यक्रमासाठी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मार्गदर्शन शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना असणाऱ्या शंकांचे निरसन करण्यात आले. या कार्यक्रमाचे नियोजन प्रा. डॉ. बी एम खामकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. नेहा तुराई, प्रा. स्वप्नील सकपाळ यांनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सानिया जाधव यांनी केले.





