अंजुमन इस्लाम जंजिरा महाविद्यालयातर्फे जनजागृती

| कोर्लई | वार्ताहर |

मुरुडच्या अंजुमन इस्लाम जंजिरा डिग्री कॉलेज ऑफ सायन्समध्ये आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत मुंबई विद्यापीठामार्फत दि. 24 सप्टेंबर ते 02 ऑक्टोबर 2023 कालावधीत राष्ट्रीय सेवा योजना दिवस जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. त्या अनुषंगाने महाविद्यालयामध्ये महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. साजिद शेख यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रमांचे व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.

तसेच विद्यार्थ्यांसाठी प्लास्टिक मुक्त समाज, लिंगभेद संवेदनशिलता व व्यसनमुक्ती या विषयांवर ऑनलाईन निबंध, वक्तृत्व व भित्तीपत्र स्पर्धा, बेस्ट फ्रॉम प्लास्टिक वेस्ट या विषयावर कार्यशाळा, प्लास्टिकपासून विविध आकर्षक वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण तसेच काशीद समुद्र किनाऱ्याची स्वच्छता मोहिम घेण्यात आली होती. अभियान यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. नितीन पवार, प्रा. अल्ताफ फकीर, प्रा. तमसील शहाजहान, प्रा. समीक्षा माळी व स्वयंसेवकांनी अथक परिश्रम घेतले.

Exit mobile version