| मुरुड-जंजिरा | वार्ताहर |
अंजुमन इस्लाम जंजिरा महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, रायगड जिल्हा पोलिस दल आणि जिल्हा वाहतूक शाखा रायगड-अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने दि.1 ते 31 जानेवारी या कालावधीत रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येत आहे. नागरीकांमध्ये रस्ता सुरक्षा विषयी जनजागृतीसाठी रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत निबंध स्पर्धा, पोस्टर स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा तसेच कार्यशाळेचे आणि पथनाट्याचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यशाळेचे आयोजन महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. साजिद शेख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. फिरोज शेख व समितीचे प्रा. अल्ताफ फकीर व विद्यार्थी प्रतिनिधी माज दाते, उसामा नखतारे, अरफात लसने, जेन दाते, ताहीर उल्डे, कैफ कादिरी, देवेश सुर्वे, मुहीत सावरी, शारीब काझी, ओंकार म्हात्रे आदींनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजयकुमार देशमुख, वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संतोष गायकवाड, पोलीस नाईक किशोर बटारे, पोलीस हवालदार मकरंद पाटील, पोलीस अंमलदार सुर्ते आणि अंजुमन इस्लाम औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील शाहीद कलाब, रफीक उल्डे आणि बुरान उल्डे उपस्थित होते.