पशु पालकांना स्वच्छता संच वितरण
। पाली । प्रतिनिधी ।
पंचायत समिती पाली सुधागड येथे मंगळवारी (दि.10) फेब्रुवारी रोजी ICAR प्रकल्प “AINP on One Health Approach to Zoonotic Diseases”अंतर्गत झुनॉटिक आजार (प्राण्यांपासून माणसांना होणारे व माणसांपासून प्राण्यांना होणारे आजार) हा एक दिवसीय जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रम मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय, मुंबई तसेच पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने पंचायत समिती, सुधागड, पाली, जिल्हा रायगड येथे संपन्न झाला. या कार्यक्रमात सुधागड तालुक्यातील 43 लाभार्थ्यांना स्वच्छता संच वितरित करण्यात आले.
सदर कार्यक्रमाचे सहयोगी अधिष्ठाता, व विशेष अतिथी मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय मुंबई डॉ. शैलेश इंगोले, प्राध्यापक व विभागप्रमुख, पशुवैद्यकीय सार्वजनिक आरोग्य विभाग तसेच सहप्रकल्प प्रमुख डॉ. रविंद्र झेंडे, प्रादेशिक सह आयुक्त पशुसंवर्धन मुंबई विभाग डॉ. प्रशांत कांबळे आणि रायगड जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय, अलिबाग डॉ. सचिन देशपांडे, डॉ. अजय कांबळे सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन अलिबाग रायगड, गट विकास अधिकारी पंचायत समिती सुधागड लता मोहिते यांनी यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पडला.
या कार्यक्रमासाठी सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन खालापूर डॉ.अशोक गाढवे, पशुधन विकास अधिकारी (विस्तार) सुधागड डॉ. सुयोग म्हस्कर यांनी झुनॉटिक आजारांविषयी जनजागृतीवर मार्गदर्शन केले. डॉ. विलास वैद्य, प्राध्यापक व प्रकल्प प्रमुख यांनी झुनॉटिक आजारांचे प्रतिबंध व नियंत्रण तसेच वैयक्तिक स्वच्छतेचे महत्त्व यावर व्याख्यान दिले. तर डॉ. जगदीश गुडेवार सहयोगी प्राध्यापक व सहप्रकल्प प्रमुख यांनी सामान्य झुनॉटिक आजारवर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी पशुधन विकास अधिकारी पाली डॉ. नम्रता काठोळे, पशुधन पर्यवेक्षक युवराज सुरकुले, प्रकाश बुलबुले, पल्लवी भालेराव व वृषाली कदम यांनी मोलाचे योगदान दिले.
