| खांब | प्रतिनिधी |
जीवनधारा सामाजिक संस्था वरसगाव-कोलाडतर्फे बालकांच्या हक्क या विषयावर जनजागृतीपर कार्यक्रम करण्यात आला. दि.12 ऑक्टोबर रोजी जीवनधारा संस्था येथे 36 आदिवासी वाड्यांमधून पहिली ते बारावीपर्यंतची 200 मुले उपस्थित होती. यावेळी नरेंद्र सोळंके, संतोष शिंदे, हिल्डा फर्नांडिस, पासे व ग्रेसी तसेच संपूर्ण जीवनधारा संस्थेचे कार्यकर्ते उपस्थित होते. संतोष शिंदे यांनी बाल हक्कांची जनजागृती केली व मुलांना त्यांच्या हक्काची जाणीव करून दिली. बालविवाह याविषयी मार्गदर्शन केले. नरेंद्र सोळंके व त्यांच्या कुटुंबांनी आलेल्या सर्व मुलांना टी-शर्ट वाटप करून मुलांमध्ये नवचैतन्य निर्माण केले.तसेच उपस्थित मुलांनी पारंपारिक नृत्य सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढविली.







