| रोहा | सत्यप्रसाद आडाव |
रोहा तालुक्यातील जिल्हा परिषद नागठाणे, आंबेवाडी, भुवनेश्वर, घोसाळे यांसारख्या मतदारसंघांमध्ये यावेळी मोठे बदल झाले असून, काही जागा सर्वसाधारण तर काही महिला (नामनिर्देशित) अशा पद्धतीने राखीव ठेवल्या गेल्या आहेत. तर पंचायत समिती कोलाड नाम प्राप्त, नागोठणे नामप्राप्त महिला, सुकेळी अनुसूचित जाती जमाती महिला, आंबेवाडी सर्वसाधारण, धाटाव सर्वसाधारण महिला, भुवनेश्वर सर्वसाधारण, न्हावे सर्वसाधारण महिला, घोसाळे सर्वसाधारण महिला असे पंचायत समिती आरक्षण पडलेले आहे. या निर्णयामुळे गेल्या काही वर्षांपासून ‘सुरक्षित बालेकिल्ला’ मानल्या जाणाऱ्या मतदारसंघांमध्येही नेत्यांची समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या या आरक्षणामुळे रोह्याच्या राजकारणात नव्या समीकरणांची चाहूल लागली आहे. काहींसाठी हे आरक्षण ‘संधीचे दार’ उघडणारे ठरले, तर काहींसाठी ‘गेल्या मेहनतीवर पाणी फेरणारे’. आता पाहायचे एवढेच की या नव्या समीकरणात कोण उभा राहतो आणि कोण पडतो, पण एक मात्र नक्की, की रोहा तालुक्याच्या राजकारणाचा नवा अध्याय सुरू झाला आहे.





