शेतकरी नेते शरद जोशी यांचे निकटवर्तीय बाबूलाल जैन यांचे निधन

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांचे निकटवर्तीय रायगड जिल्ह्यातील शेतकरी संघटनेचे निष्ठावंत कार्यकर्ते बाबूलाल मांगीलाल जैन यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. निधनासमयी ते 78 वर्षांचे होते. त्यांच्या पश्‍चात पत्नी पुष्पलता, विपुल, आनंद मुले, मुलगी नीता रांका सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

मूळचे पेण येथील रहिवासी असणारे बाबूभाई व्यवसायानिमित्त अलिबाग तालुक्यातील रेवदंडा येथे आले. अलिबागमधील प्रसिद्ध अलंकार ज्वेलर्स या सोन्याच्या पेढीचा त्यांचा व्यवसाय आहे. रेवदंडा अर्बन बँकेत संचालक म्हणून देखील त्यांनी काम पाहिले. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच अनेकांनी त्यांच्या निवासस्थानी धाव घेतली. त्यांच्या पार्थिवावर सांयकाळी रामनाथ येथील वैकुंठधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Exit mobile version