बाबुलाल पाखरे, राजश्री नागे यांचा सेवापूर्ती सोहळा

| कोर्लई | वार्ताहर |

मुरुड तालुका पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी बाबुलाल पाखरे व नगरपरिषदेच्या वरीष्ठ सहाय्यक राजश्री नागे 31 मे रोजी सेवेतून सेवानिवृत्त होणार आहेत.

तसेच नगरपरिषदेच्या कार्यालयीन वरिष्ठ सहाय्यक राजश्री नागे सेवानिवृत्त होत असल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमासाठी तालुक्यातून 150 शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमासाठी उपशिक्षणाधिकारी सुनील भोपले, माणगाव गटशिक्षणाधिकारी सौ. खरात, जिल्हा समन्वयक संदीप वारगे मुरुड गटविकास अधिकारी सौ. भांगरे, आय सी डीएस प्रमुख शेडगे मुरुड मुख्य लेखा सहाय्यक वानखडे, मुरुड विस्तार अधिकारी सुनील गवळी, प्रशासन अधिकारी दिपाली दिवेकर, केंद्रप्रमुख मोहिनी पाटील व सर्व केंद्रप्रमुख तसेच फौजमल पाखरे, आई, पत्नी, मुलगा, मुलगी, पुतण्या, वहिनी असा परिवार उपस्थित होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन राजेंद्र नाईक व जगदीश चवरकर यांनी केले.

Exit mobile version