| चिरनेर । वार्ताहर ।
मुख्यमंत्री सडक योजना व पंतप्रधान ग्राम सडक योजना अंतर्गत सध्या शहरातील व ग्रामीण भागातील रस्त्यांचा विकास झपाट्याने होत आहे. मात्र तालुक्यातील विधणे ग्रामपंचायत हद्दीत येणार्या टाकी गावाच्या रस्त्याचे काम मागील पाच वर्षापासून रखडले आहे. त्यामुळे खड्डेमय रस्त्यातून नागरिकांना व वाहन चालकांना मार्गक्रमण करावे लागत आहे. टाकी गावाकडे जाणार्या या दीड किलोमीटर रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्यामुळे रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे.
सदर रस्त्याचे नव्याने डांबरीकरण करण्यात यावे यासाठी ग्रामपंचायतीच्या क्रांती जोशी, शुभांगी जोशी, किशोर खारपाटील, वसंत नाईक, सिकंदर जोशी, यांच्यासह इतर लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेकडे मागणी केली आहे.