प्रशांत मिसाळ यांना जामीन

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।

कोर्लई येथील कथित 19 बंगल्यांच्या घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आलेले ठाकरे गटाचे कोर्लईचे सरपंच प्रशांत मिसाळ यांना मुरुड न्यायालयाने गुरुवारी जामीन अर्ज मंजूर केला आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांना अटक करण्यात आली होती. न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. त्याची मुदत आज संपली. त्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यावर त्यांनी जामीन मिळण्यासाठी न्यायालयात अर्ज केला. सदर अर्ज मंजूर करीत त्यांची 20-20 हजाराच्या दोन जामीनावर मुक्तता करण्यात आली.

Exit mobile version