| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
पनवेल तालुक्यातील एका शिक्षण संस्थेच्या कारभाराविरोधात माजी सरपंच अनिल ढवळे यांनी उपोषण सुरु केले आहे. शेतकरी कामगार पक्षाचे नेते माजी आ. बाळाराम पाटील यांन बुधवारी (दि.27) सकाळी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन त्यांना पाठींबा दर्शविला.
मिळालेल्या माहितीनुसार, पनवेल तालुक्यातील शिवकर येथील श्री गणपती देवस्थान ट्रस्ट या संस्थेच्या श्री गणपती इंग्लिश मिडीयम स्कूल या संस्थेच्या मुख्य विश्वस्त म्हणून दिलेले हमीपत्र हे खोटे व बनावट आहे. त्यांच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा असा आरोप करीत पनवेलमधील शिवकर येथील अनिल ढवळे यांनी अलिबागमध्ये माध्यमिक शिक्षण अधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरु केले. सोमवारी (दि.25) पासून हे उपोषण सुरू आहे. या उपोषणाला तीन दिवस झाले आहेत. मात्र, अद्यापर्यंत जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाकडून कोणतीही कार्यवाही केली नाही. अनिल ढवळे हे गेल्या तीन दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. ही बाब शेकापचे नेते माजी आ. बाळाराम पाटील यांच्या लक्षात आली. त्यांनी बुधवारी सकाळी अलिबागमध्ये जाऊन उपोषणकर्ते ढवळे यांची भेट घेतली.
बाळाराम पाटील यांनी घेतली उपोषणकर्त्यांची भेट
