बाळासाहेब खाडे यांची तडकाफडकी बदली

कर्तव्यात केलेल्या गंभीर स्वरूपाच्या कसुरीचा ठपका

। अलिबाग । प्रतिनिधी ।

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. प्रभारी अधिकारी म्हणून काम पाहत असताना कर्तव्यात केलेल्या गंभीर स्वरूपाच्या कसुरीचा ठपका खाडे यांच्यावर ठेवण्यात आला असून त्यांची श्रीवर्धन पोलीस ठाण्यात बदली करण्याचे आदेश सोमवारी काढण्यात आले आहे.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक म्हणून 21 जून 2023 मध्ये रुजू झाले होते. दोन वर्षापासून ते कार्यरत होते. आंचल दलाल यांनी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून धुरा हाती घेतल्यावर पोलीस विभागातील कामाचा आढावा घेतला व वर्षोनवर्ष एकाच ठिकाणी राहणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या .

आता बाळासाहेब खाडे यांच्या जागी नियंत्रण कक्षातील पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे स्थानिक पोलीस निरीक्षक पदाची धुरा खोपडे यांच्या हाती असणार आहेत.
बाळासाहेब खाडे यांना तात्काळ कार्यमुक्त होऊन नेमणुकीच्या ठिकाणी हजर होण्याचे लेखी आदेश देण्यात आले आहेत. पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी खाडे यांची श्रीवर्धनमध्ये बदलीचे आदेश काढले आहेत. खाडे यांची अचानक बदली करण्यात आल्याने पोलीस दलात खळबळ उडाली असून काहींनी आनंद व्यक्त केला असल्याची चर्चा पोलीस दलात सुरू आहे.

Exit mobile version