| खांब | वार्ताहर |
रोहा तालुक्यातील कोलाड ग्रामीण क्रिकेटअसोशिएशन आयोजित श्री क्षेत्र तळवलीतर्फे अष्टमी येथे तरूण मंडळ व ग्रामस्थ मंडळ यांच्या वतीने क्रिकेटचे सामने आयोजित करण्यात आल्या होत्या. स्पर्धेचे उद्घाटन मारूती कोलाटकर, मनोज मरवडे, रविंद्र मरवडे, दयाराम मरवडे, नंदकुमार मरवडे यांच्या हस्ते करण्यात आले.
या स्पर्धेत बल्हे संघाने प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला. तर द्वितीय क्रमांक एम. सी. सी. मोहला, तर तृतीय व चतुर्थ क्रमांक शिव प्रेमी डोलवहाल व अजय इलेव्हन खांब यांनी पटकाविले.
स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज मनीष पार्टे (खांब), उत्कृष्ट गोलंदाज आयाज (मोहला), मालिकविर नागेश शेलार (बल्हे) व उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून प्रज्योत धामणसे (डोलवहाल) यांना सरपंच रविंद्र मरवडे, एकनाथ मरवडे, दत्ताराम मरवडे, अरविंद भिलारे, वासुदेव मरवडे मारुती बामणे, वामन कोस्तेकर, रविंद्र तारू आदी मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.







