बळवंत वालेकरांचा आदर्शकडून सत्कार

| कोर्लई | वार्ताहर |

रायगड जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार तथा साप्ताहिक कुलाबा वैभवचे संपादक बळवंत वालेकर यांनी वयाची 80 वर्षे पूर्ण केल्याबाबत व सहकार क्षेत्रात महाराष्ट्रातील अग्रगण्य पतसंस्था असलेल्या आदर्श नागरी सहकारी पतसंस्था अलिबागतर्फे त्यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी आदर्श पतसंस्थेचे संस्थापक-अध्यक्ष सुरेश पाटील, अध्यक्ष अभिजित पाटील, उपाध्यक्ष कैलास जगे, संचालक अनंत म्हात्रे, सतीश प्रधान, संजय राऊत, विलाप तांडेल, डॉ. मकरंद आठवले, तज्ज्ञ संचालक वाणी, संस्थेच्या सीईओ मीनाक्षी पाटील यांसह बहुसंख्य भागधारक उपस्थित होते.

Exit mobile version