। ठाणे । प्रतिनिधी ।
कोपरी परिसरात देशी प्रजातीतील कोंबडी आणि टर्की कोंबडी यांचा मृत्यू झाला होता. कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूने झाल्याचा अहवाल राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाकडून ठाणे महापालिकेला प्राप्त झाला आहे. त्यामुळे कोपरीमधील चिकन आणि मटणाची दुकाने पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश पालिका प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.
ठाणे पूर्व येथील कोपरी परिसरात देशी प्रजातीतील कोंबडी आणि टर्की कोंबडी यांचा 14 जानेवारीला मृत्यू झाला होता. कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूने झाल्याचा अहवाल राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाकडून ठाणे महापालिकेला प्राप्त झाल्यानंतर जिल्हा प्रशासन धावपळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर कोपरी परिसरात सुरक्षेचा उपाय म्हणून कोंबडी आणि मटण विक्रीला बंदी करण्यात आली आहे. शहरात बर्ड फ्ल्यूचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे पत्र ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाने महापालिकेला पाठवले आहे.