। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील चोरोंडे येथील श्री सेवाशक्ती ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेस बँको पुरस्कार जाहीर झाला आहे. त 6 वेळा श्री सेवाशक्ती ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचा बँको ब्लू रिबन पुरस्काराने सन्मान झाला आहे. हा या पतसंस्थेचा बँको पुरस्काराने 7 वा सन्मान असणार आहे.तज्ज्ञ निवड समितीने केलेल्या मूल्यांकनानुसार श्रीसेवाशक्ती पतसंस्थेची बँको पतसंस्था ब्ल्यू रिबनसाठी निवड करण्यात आली आहे.
या पतसंस्थेची प्रगतीची घोडदौड सुरु आहे. या पतसंस्थेत ठेवी 36 कोटी 16 लाख रुपयांच्या ठेवी आहेत. 28 कोटी 38 लाख रुपयांचे कर्ज वाटप झालेले असून, 13 कोटी 25 लाखांची गुंतवणूक केलेली आहे. भाग भांडवल 2 कोटी 06 लाख रुपयांचे आहे. सी.डी. रेश्यो 71.79 टक्के, रोखता निधी 1.10 टक्के, तरलता निधी 35.65 टक्के, सीआरएआर 22.53 टक्के आहे. ही पतसंस्था 9001-2015 मानांकन प्रमाणित असून सतत 6 वर्ष बँको पुरस्कार, महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचा सतत 3 वर्ष दीपस्तंभ पुरस्कार मिळाला आहे. स्थापनेपासून सतत ऑडिट वर्ग अ या पतसंस्थेने मिळवला आहे.







