| आगरदांडा | प्रतिनिधी |
बँक ऑफ महाराष्ट्र बँकेत कर्मचार्यांची संख्या अपुरी आहे. परिणामी, कामाचा ताण कर्मचार्यांवर अधिक प्रमाणात होत आहे. बँकेतील कर्मचार्यांची संख्या वाढवत नसल्याचा आरोप बँक संघटनेकडून करण्यात येत आहे. यावर तोडगा काढावा, अशी मागणी करीत एकदिवसीय संप पुकारला. मुरुड येथील बँकेचे कर्मचारी या संपात सहभागी झाल्याने शहरातील व पंचक्रोशीतील ग्राहक त्रस्त झाले आहेत.
शहरात व ग्रामीण भागात बँक ऑफ महाराष्ट्राचे एटीएम सेवाही इतर बँकेच्या एटीएमचा आधार घ्यावा लागतो. आधी बँकेने चांगली सेवा द्यावी नंतर संपावर जावे, अशी प्रतिक्रिया बँकेच्या ग्राहकांकडून होत आहे.