बंडखोर आमदारांविरोधात खालापूरातील शिवसैनिक शांत
| संतोषी म्हात्रे | खोपोली |
महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारला मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागत असून शिवसेनेचे ज्येष्ठ मंत्री व नेते एकनाथ शिंदे 35 हुन अधिक आमदारा बरोबर गेल्याने शिवसेना पक्षप्रमुख यांच्याकडे असणारे मुख्यमंत्री पद जाण्याच्या मार्गावर असल्याने सर्वत्र बाळासाहेबांना मानणारा शिवसैनिक या बंडखोर आमदारांच्या विरोधात निदर्शने सुरू असताना खालापुरात मात्र शिवसेना नेते व शिवसैनिक संभ्रमात असून शांत आहेत तर या धर्तीवर कर्जत येथील नगरसेवक नितीन सावंत यांनी शिवसेना पक्षप्रमुख यांच्या समर्थनार्थ बॅनर लावून आम्ही शिवसेनेच्या पाठीशी असल्याचे बॅनर झळकले मात्र खालापुरात शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना मानणारा शिवसैनिक किंवा पदाधिकारी आहे की नाही असा प्रश्न पडला असुन सहा दिवसानंतर ही खालापूर खोपोली मधील शिवसैनिक व नेते संभ्रमात आहेत असेच म्हणावे लागेल अशीच सध्या स्थिती दिसून येत आहे.
रायगड जिल्ह्यातील शिंदे समर्थक म्हणून तीन आमदारांनी बंडखोरी केल्याने रायगड जिल्ह्यातील शिवसैनिकामध्ये खळबळ उडाली त्यामुळे सुरुवातीच्या काळात हे सर्वजण पुन्हा परततील असे वाटत असताना याचे शिंदे गटाने पक्षप्रमुख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अहवान देत थेट मातोश्री वरच अविश्वास दाखवून तुम्ही चुकीचे आहात असे भासवून दिल्याने ही बंडाळी उघडउघड अडचणीत आणणारी असल्याचे दिसल्याने संपूर्ण महाराष्ट्रात शिवसैनिकांचा उद्रेक दिसून आला तर रायगड जिल्ह्यातील शिवसेनेने खारघर येथे बैठक घेऊन या आमदारांच्या भूमिके विरोधात जोरदार विरोध दर्शवत आंदोलन केले असले तरी सहा दिवसानंतर खालापुरात भयाण शांतता दिसून आली या घटनेसदर्भात काहीतरी बैठक किंवा समर्थ होईल असे वाटत असताना कर्जतचे नगरसेवक नितीन सावंत याने खालापूर व खोपोली शहरात शिवसेना पक्ष प्रमुख यांच्या समर्थ करणारे बॅनर लावून आम्ही शिवसेने बरोबर असे बॅनर झळकले मात्र खोपोली शहरात बालसाहेबांचे शिवसैनिक आहेत तरी कुठे अशी चर्चा सुरु झाली असून एक ही पदाधिकारी किंवा शिवसैनिक आमदारांचे समर्थ ना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचे समर्थ करताना दिसत आहेत त्यामुळे खोपोली खालापूर ची शिवसेना संभ्रमात असल्याचे सहा दिवसानंतर दिसून येत असल्याने बाळासाहेबांचे सैनिक आहेत कुठे अशीच चर्चा सर्वत्र सुरू आहे
खोपोली खालापुरात मोठ्या प्रमाणात शिवसेना नेत्यांचा भरणा आहे आणि आक्रमक ही आहेत मागील काळात या नेतेत्यांचा आणि शिव सैनिकांच्या आक्रमक भूमिका ही सर्वांनी पाहिली आहे मात्र सध्या सुरू असलेल्या शिवसेनेतील बंडखोरी
झाल्याने याबाबत ना पक्षाचे ना स्थानिक आमदारांचे समर्थन करताना दिसत असून शिवसेनेच्या पाठिंब्याचा खोपोली खालापुरात कर्जत येथील नगरसेवकाने बॅनर लावल्याने एकच चर्चा सध्या खोपोली व खालापूर तालुक्यात आहे याबाबत खोपोली व खालापुर तालुक्याची धुरा असणाऱ्या नेतेच्या प्रतिक्रिया घेण्यासाठी दूरध्वनी वरून संपर्क करण्याचा प्रयत्न केल्याने प्रतिसाद मिळाला नाही.