बार्टी विम्बल्डनची नवी सम्राज्ञी

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
ऑस्ट्रेलियाच्या अग्रमानांकित अ‍ॅश्‍ले बार्टी हिने चेक प्रजासत्ताकच्या कॅरोलिना प्लिस्कोव्हा हिचा संघर्षपूर्ण अंतिम लढतीत पाडाव करत विम्बल्डन खुल्या टेनिस स्पर्धेच्या जेतेपदावर पहिल्यांदाच नाव कोरले. फ्रेंच खुल्या स्पर्धेनंतर (2019) बार्टीचे हे दुसरे ग्रँडस्लॅम जेतेपद ठरले.प्लिस्कोव्हाची कडवी लढत मोडीत काढत बार्टीने 6-3, 6-7 (4/7), 6-3 असा विजय मिळवत जेतेपद पटकावले. मार्गारेट कोर्ट (1963, 1965 आणि 1970), इव्होनी गुलागाँग कावली (1971 आणि 1980) यांच्यानंतर विम्बल्डनचे जेतेपद पटकावणारी बार्टी ही ऑस्ट्रेलियाची तिसरी महिला टेनिसपटू ठरली आहे.

बार्टीने पहिल्या सेटमध्ये सुरुवातीलाच दोन वेळा प्लिस्कोव्हाची सव्र्हिस मोडीत काढत 4-0 अशी आघाडी घेतली होती. बार्टीचा खेळ बहरत असताना प्लिस्कोव्हाला गुण मिळवतानाही कठीण जात होते. बार्टी पहिला सेट सहजपणे जिंकणार असे वाटत असतानाच प्लिस्कोव्हाने दोन वेळा सव्र्हिस भेदत प्रतिकार केला. बार्टीने अखेर पहिला सेट 6-3 अशा फरकाने जिंकून सामन्यात आघाडी घेतली.

Exit mobile version