। चिरनेर । वार्ताहर ।
चिरनेर रांजणपाडा येथील शिवसेना प्रणित नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीने नवरात्र उत्सवात रविवारी शक्ती तुरांच्या जंगी सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. नाचाच्या सामन्यांचे उद्घाटन शशांक ठाकूर, संतोष ठाकूर, गणेश म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आले.
नाचाच्या सामन्यांना दर्शकांचा उदंड प्रतिसाद लाभला. आगरी, कोळी, कराडी, आदिवासी समाजातील पूर्वापार परंपरागत विविध कला आज लुप्त होऊ लागल्या आहेत. परंतु जिल्ह्यामध्ये या समाजामध्ये काही प्रमाणात या कला अजून शाबूत ठेवण्यात आल्या आहेत. यात होंडावाडी अलिबाग येथील शक्ती गटाचे सदानद लोभी, कृष्णा पारधी, बळीराम होळा, नंदकुमार झावरे व रघुनाथ पाटील यांच्या गावदेवी महिला नाच मंडळाच्या वतीने नाचाचा कार्यक्रम सादर करण्यात आला तर या सामन्यातील जय हरजाई माता नाच मंडळ केलगायणी, सुधागड यांनी आपल्या नाच मंडळाच्या माध्यमातून नाचाचा आविष्कार सादर केला.