। नवीन पनवेल । वार्ताहर ।
भांडणाचा राग मनात धरून लोखंडी रॉड व लाकडी बांबू व वायरने मारहाण केल्याची घटना कळंबोली परिसरात घडली आहे. याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कळंबोली, सेक्टर 2 ई येथे राहणारे माथाडी कामगार अरुण शिंदे यांना 30 एप्रिल रोजी मित्राचा फोन आला. व अमरजित केवर यांना मुले मारत असल्याचे त्यांना सांगण्यात आले. यावेळी कातकर वाडीतील मुले अमरजीत यांना धक्काबुक्की करत होते. त्यांना समजावण्याचा प्रयत्न अरुण शिंदे यांनी केला. यावेळी करण नाईक या मुलांने अरुण शिंदे यांच्या डोक्यात हेल्मेट मारले. करण नाईक, विकी लॉरी, अजय नाईक यांनी शिवीगाळ व धक्काबुक्की केली. ही गोष्ट किरकोळ असल्याने शिंदे पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी गेले नाहीत. त्यानंतर 1 मे रोजी शिंदे स्मृतीवन गार्डन येथे बसले होते. यावेळी विकी लोरी व करण नाईक हे वायर व रॉड घेऊन आले. यावेळी शिंदे यांना पकडून वायर व बांबूने मारहाण केली व लोखंडी रॉडने त्यांच्या डोक्यात वार केला. यावेळी शिंदे जखमी झाले. कातकरवाडी येथील रोशन नाईक, विकी लोरी, करण नाईक, अजय नाईक त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.