शिवीगाळ करून बॅटने मारहाण

नवीन पनवेल | वार्ताहर |
नोकरीवर झोपलेला असल्याच्या कारणावरून बॅटने मारहाण केल्याची घटना कामोठे येथे घडली आहे. आरोपी अनिल कुमार पांडे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय सुदाम वाघमारे हे कामोठे, सेक्टर 24, येथील सोसायटीमध्ये भगत सेक्युरिटी सर्विस या कंपनीच्यामार्फत वॉचमेन म्हणून नोकरी करतात. या कंपनी मध्ये सुपरवायझर या पदावर अनिल कुमार श्यामसुंदर पांडे हे नोकरी करतात. ते तपासण्या करता अधून-मधून सोसायटीमध्ये येत असतात. नोकरी करत असताना दुपारचे जेवण करून संजय वाघमारे झोपला असताना अनिल कुमार पांडे हे सोसायटीमध्ये राऊंड अपसाठी आले. त्यांना संजय वाघमारे झोपलेला दिसल्याने त्याला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. आणि त्याचा राग मनात धरून पांडे याने रूमच्या बाजूला असलेली बॅटने वाघमारे यांना मारहाण केली. आणि त्यांचा गळा दाबला.

Exit mobile version