| उरण | वार्ताहर |
शेतीसोबत पूरक व्यवसायातून रोजगारनिर्मित व्हावी यासाठी पशुसंवर्धन विभागाकडून विविध योजना राबविल्या जात आहेत. कुक्कुट पालन शेळी गट आणि दुधाळ जनावरांचा गट योजनांसाठी उरण तालुक्यातील 34 ऑनलाइन अर्ज आले होते. त्यापैकी तालुक्यात मंजूर नऊ लाभार्थ्यांना योजनांचा लाभ मिळणार आहे, अशी माहिती पशुधन अधिकारी पंचायत समिती उरण डॉ. अनिल धांडे यांनी दिली.
नऊ लाभार्थ्यांना राज्यस्तरीय योजनेतून लाभ मिळणार आहे. त्यापैकी 4 दुधाळ गाय -म्हैस, 4 शेळी मेंढी पालन, 1 कुक्कुट पालन 1 हजार पिल्ले अशा योजना आहेत. गरजू शेतकर्यांसाठी शासनाकडून निधी उपलब्ध करून दिला जात आहे. यासाठी शेतीपूरक व्यवसायाची निर्मिती झाली असून, शेतकर्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी मदत होणार आहे. या योजनेमध्ये राज्यस्तरीय कुक्कुट वर्षांसाठी ही योजना आहे. पालन 1000 पिल्ले 50 टक्के अनुदान, दुधाळ गाय म्हैस 50 टक्के अनुदान, शेळी मेंढी पालन 50 टक्के अनुदान या योजनेमध्ये 1 बोकड आणि 10 बकर्या असा समावेश आहे.
शासनाने योजना पारदर्शक होण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहेत. पाच वर्षांसाठी उरणमधून नऊ अर्ज मंजूर आहेत. ज्या अर्जदारांचे अर्ज आले आहेत, त्यांना पुढील वर्षी प्राधान्य दिले जाणार आहे.
डॉ. अनिल धांडे, पशुधन अधिकारी, उरण