सुरेखा भणगे यांना उत्कृष्ट प्रशासक पुरस्कार

। माथेरान । वार्ताहर ।
माथेरान नगरपरिषदेच्या प्रशासक तथा मुख्याधिकारी पदाची जबाबदारी स्विकारण्यापूर्वी सुरेखा भणगे यांनी खालापूर नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी पदाची सुत्रे हाती घेतली होती. त्यावेळी त्याठिकाणी त्यांनी कोरोना महामारी, चक्रीवादळ अशा संकट काळात प्रशासक म्हणून भक्कमपणे कामगिरी करीत सर्वसामान्य लोकांसाठी मदतकार्य केले होते. आदिवासी वाड्या-वस्त्यांवर समक्ष भेटी देऊन अनेक शाश्‍वत विकासकामे पूर्ण केलीत, कोरोना महामारीत बाधितांना उपचार मिळवून देण्यासाठी मोलाचे सहकार्य केले. मध्यरात्रीच्यावेळी स्मशानात उभी राहून अत्यंविधीसाठी सुध्दा जातीने लक्ष देऊन मदतकार्य केले होते. अशा रणरागिनी प्रशासक तथा एक कार्यतत्पर मुख्याधिकारी सुरेखा भणगे-शिंदे यांच्या कामाची दखल घेत स्टार महाराष्ट्र संस्थेकडून उत्कृष्ट प्रशासक पुरस्काराने त्यांना दि.9 एप्रिल रोजी सन्मानित करण्यात आले आहे. पनवेल येथे वासुदेव बळवंत फडके सभागृहात आयोजित कार्यक्रम मुख्याधिकारी सुरेखा भणगे यांना उत्कृष्ट प्रशासक पुरस्काराने सन्मानित केले आहे.

Exit mobile version