| सुधागड-पाली । वार्ताहर ।
महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागातर्फे दरवर्षी 1 ऑगस्टला महसूल दिन साजरा केला जातो , दरवर्षी महसूल दिनाचे औचित्य साधून महसूल विभागातील कर्मचार्यांना उत्कृष्ट अधिकारी आणि कर्मचारी पुरस्कार प्रदान केले जातात. यावर्षी सुधागडचे तालुक्याचे तहसीलदार दिलीप रायन्नावर याना त्यांनी केलेल्या चांगल्या कामाबद्दल जिल्हाधिकारी कार्यालयात उत्कृष्ट अधिकारी या पुरस्काराने जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. सुधागड तालुक्यात दिलीप रायन्नावर रुजू झाल्यापासून त्यांनी अनेक अभिनव उपक्रम हातात घेतले त्यामाध्यमातून आदिवासी जनतेची कामे, वृक्ष लागवड, जंगल संवर्धन असे उपक्रम हाती घेतले आहेत त्यामुळे योग्य अधिकार्याला हा पुरस्कार मिळाल्याचा भावना नागरिकांकडून व्यक्त होत असून त्यांच्यावर तालुक्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.