आमदार जयंत पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

। अलिबाग । प्रतिनिधी ।

शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आ. जयंत पाटील यांचा रविवारी (दि.07) वाढदिवस असल्याने त्यांना राजकीय, सामाजिक, सहकार, क्रीडा व अन्य क्षेत्रातील मान्यवरांनी भ्रमणध्वनीवरून अभिष्टचिंतनाच्या शुभेच्छा दिल्या.

वाढदिवस जल्लोषात साजरा करणार नसल्याने शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांची निराशा झाली होती. परंतु आपल्या खंबीर नेतृत्वाला निरोगी दीर्घायुष्य लाभावे यासाठी कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांनी जागोजागी आमदार जयंत पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे जाहिरात फलक लावले होते. राज्यातील शेतकरी कामगार पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी आणि कार्यकर्त्यांनी आपापल्या कार्यक्षेत्रात आमदार जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. आमदार जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पीएनपी शैक्षणिक संकुलात एकपात्री अभिनय स्पर्धेचे आयोजन केले होते. प्रभाकरंडक या नावाने घेण्यात आलेल्या या स्पर्धेला ग्रामीण कलाकारांना संधी देण्यात आली होती. महाविद्यालयाच्या सभागृहात या स्पर्धेला 50 हून अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता.

Exit mobile version