| पाली/गोमाशी | वार्ताहर |
जय हनुमान क्रीडा मंडळ रासळ येथे रायगड जिल्हा व सुधागड तालुका कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने तालुका स्तरीय कबड्डी स्पर्धाचे आयोजन शनिवार ता 7 रोजी करण्यात आले होते. 49 व्या क्रीडा महोत्सवानिमित्त या स्पर्धेत 32 संघाने सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेतील खेळाडूंनी आपला विजय मिळवण्यासाठी बहारदार खेळ केला.मात्र या स्पर्धेतील अंतिम विजयी श्री भैरीनाथ क्रीडा मंडळ वावे हा संघ ठरला.
या संघास रोख रक्कम 15 हजार व आकर्षक चषक,तर उपविजेता श्री नाथ भैरव झाप या संघास रोख रक्कम 10 हजार व आकर्षक चषक,तृतीय क्रमांक श्री भैरी भवानी शिलोशी संघास रोख रक्कम 5 हजार व आकर्षक चषक,चतुर्थ क्रमाक श्री काळभैरव आपटवणे या संघास रोख रक्कम 5 हजार व आकर्षक चषक देऊन प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत मंडळाच्या वतीने गौरविण्यात आले. या स्पर्धेतील मालिकावीर प्रसाद हिर्डेकर (वावे) तर उत्कृष्ट चढाईदार यश सितापराव (झाप) उत्कृष्ट पक्कड अनिकेत पवार (शिलोशी) या खेळाडूंना आकर्षक चषक देऊन सन्मानित करण्यात आले.या स्पर्धेचे समालोचन अलंकार मनवी याने केले.