मुरुडमध्ये विकसित भारत संकल्प यात्रा

शहरातील शेकडो लाभार्थींनी घेतला लाभ
| आगरदांडा | प्रतिनिधी |

केंद्र सरकारच्या लोककल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने देश पातळीवर सुरु असलेल्या विकसित भारत संकल्प यात्रेच्या वाहनाचे सोमवारी मुरुड-जंजिरा नगरपरिषद कार्यालयातील प्रांगणात आगमन झाले. या कार्यक्रमाचे उद्घाटन नगरपरिषदेचे सहा. कर निरीक्षक नंदकुमार आंबेतकर यांच्या हस्ते यात्रेच्या वाहनाला पुष्पहार अर्पण करून व श्रीफळ वाढवून करण्यात आले.

यावेळी प्रशासक तथा मुरुड मुख्याधिकारी पंकज भुसे, प्रशासकीय अधिकारी परेश कुंभार, सहा.निरीक्षक नंदकुमार आंबेतकर, लिपिक मनोज पुलेकर, आरोग्य निरीक्षक राकेश पाटील, सतेज निमकर, प्रशांत दिवेकर, प्रकाश आरेकर, डॉ. नेहा शेंडगे, नर्स निर्मला भोसले, प्रज्ञा पवार, दक्षता चोगले, सुग्रीव टोकरे, कौस्तुभ काटकर, बॅक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक प्रकाश गोंजी, दिपाली दिवेकर, नयन कर्णिक, अरविंद गायकर, सुदेश माळी, अक्षता तुळसकर, उमेश शिंदे, स्वप्नजा विरुकुड, उदय सबनीस, शासकीय-निमशासकीय अधिकारी आदींसह मान्यवर उपस्थित होते.

यावेळी पंकज भुसे म्हणाले की, विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना थेट नागरिकांपर्यंत न पोहोचविण्याचे कार्य केले जात आहे. शेकडो नागरिकांनी मोठ्या प्रमाणात संकल्प यात्रेत सहभाग नोंदवून उपक्रमांची माहिती घेतली. त्याचप्रमाणे विविध कल्याणकारी योजनांचा शेकडो लाभार्थीनी लाभ घेत विकसित भारतासाठीची शपथ घेतली गेली.

Exit mobile version