| कोर्लई | वार्ताहर |
रायगड जिल्हा हा नैसर्गिक मानव निर्मित बहु प्रवण क्षेत्र आहे. येणाऱ्या मान्सून कालावधीमध्ये आपत्ती प्रवण गावामध्ये पूर्व तयारी करणे, जन जागृती करणे, तात्काळ प्रसिद्धी देणे इत्यादी कामांसाठी मुरूड नगरपरिषदेच्या सभागृहात एक दिवसीय प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.
रायगड जिल्ह्यात सर्वत्र विशेषतः समुद्रकिनार पट्टीत येणारे पर्यटक व नागरिकांच्या सुरक्षितते संदर्भात एनडीआरएफच्या टिमकडून मुरुड तालुक्यातील सरपंच, ग्रामसेवक,पंचायत समिती, नगर परिषद कर्मचारी व पोलीस कर्मचारी यांना मॉकड्रिल करून प्रात्यक्षिक दाखविण्यांत आले. नागरी संरक्षण दलातील मनोहर म्हात्रे यांनी सर्व सहकार्यांच्या माध्यमातून स्वतः प्रात्यक्षिक करून दाखविले. मुरुड नगरपरिषद कार्यालयीन अधिक्षक नंदकुमार आंबेतकर यांनी नायब तहसीलदार राजश्री साळवी, पोलीस निरीक्षक प्रतिनिधी अविनाश पाटील व प्रशिक्षक मनोहर म्हात्रे यांचे स्वागत केले. तर, माजी नगरसेवक पांडुरंग आरेकर यांनी आभार मानले.