| नेरळ | प्रतिनिधी |
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गतिमान प्रशासन 100 दिवसांचा कार्यक्रम सर्व शासकीय कार्यालयांना आखून दिला होता. या गतिमान प्रशासनाच्या कामाचा आढावा घेण्यात आल्यानंतर जिल्हावार, विभागवार निकाल जाहीर करण्यात आले. दरम्यान, कर्जत येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाच्या कामगिरीमुळे या कार्यालयाला कोकण विभागात दुसरा क्रमांक मिळाला आहे.
कार्यालयातील तक्रारदार यांना वेळेत सुविधा उपलब्ध करून देणे, नागरिकांना त्यांच्या अडीअडचणी तत्काळ सोडवणे तसेच कार्यालयातील वेबसाईट सुधारणा, कार्यालयीन सोई सुविधा, स्वच्छता, तक्रार निवारण, सुलभ जीवनमान, गुंतवणुकीस चालना, तंत्रज्ञानाचा वापर इत्यादी 10 मुद्यांवर तालुका स्तरावरील सर्व कार्यालयांचे मूल्यमापन करण्यात आले होते. दरम्यान, सर्व शासकीय विभागांच्या प्रत्येक महसूली विभागातील उत्कृष्ट तीन तालुका कार्यालयांची निवड मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली. त्यात कोकण महसूल विभागांतर्गत सार्वजनिक बांधकाम उपविभाग कर्जत यांना द्वितीय क्रमांक जाहीर झाला आहे.