| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील मोरेवाडी येथील रहिवाशी असलेले जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक केवारी यांचे पुत्र हे एमबीबीएस पदवी मिळवून वैद्यकीय अधिकारी बनले आहेत. भूमिपुत्र असलेले वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल यांच्याकडे कळंब प्राथमिक आरोग्य केंद्राची जबाबदारी देण्यात आली आहे. रायगड जिल्हा परिषदेने वैद्यकीय शिक्षण पूर्ण करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रावर 11 महिन्यांचा कालावधीसाठी पाठवण्याचा निर्णय घेतला होता. या अकरा महिन्यांचे पत्र डॉ. विशाल यांनी अलिबाग येथे जिल्हा परिषद मुख्यालयात स्वीकारले. ते तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नितीन गुरव यांच्यासह कळंब प्राथमिक आरोग्य केंद्राची वैद्यकीय अधिकारी पदाची जबाबदारी स्वीकारणार आहेत.