भारतभूषण राष्ट्रीय पुरस्कार जिविता पाटील यांना प्रदान

। अलिबाग । प्रतिनिधी ।
कुसुंबळे – कातळपाडा गावातील अंगणवाडी सेविका जिविता सूरज पाटील यांना दिल्ली येथे केंद्र सरकारतर्फे उत्कृष्ट अंगणवाडी सेविका (सामाजिक कार्य) म्हणून भारतभूषण राष्ट्रीय पुरस्कार खा. मुकेश देसाई यांच्या हस्ते देऊन सन्मानपूर्वक गौरविण्यात आले. सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, साहित्यिक, क्षेत्रातील योगदानाबद्दल हा पुरस्कार प्रदान आला.

याबद्दल त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना हा पुरस्कार एकटीचा नसून महाराष्ट्रातल्या तमाम अंगणवाडी सेविकांचा असल्याचे आवर्जून नमूद केले.तसेच नेहमी साथ देणार्‍या त्यांच्या सासू मनोरमा पाटील यांचे ऋण व्यक्त केले.

Exit mobile version